LIC म्हणजे आपल्या सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. पगारातून कपात होणारी रक्कम LIC कडे जमा होती का नाही याची खूप काळजी प्रत्येकालाच आहे. त्या साठी आपल्याला lic ऑफिस ला जाऊनच पहावे लागते पण हे प्रत्येक महिन्याला शक्य होत नाही आणि बऱ्याच महिन्यानंतर आपल्याला कळते कि रक्कम तर payment मधून जाते पण lic कडे जमा होत नाही.मग आपली तारांबळ व धावाधाव वाढते.
मग आपल्या या महत्वपूर्ण lic संदर्भात आपल्याला घरी बसल्या सर्व update/Status/Loan Status/bonus/policy maturing Date/Last Paid Date/ Next Due Date/online payment इत्यादी मोबाईल किंवा संगणक यावरून समजले तर....?
किती काम सोप होईल ना?
LIC कडून यासाठी मोबाईल app देखील create केलं आहे पण त्यात काही मर्यादा आहेत.app वरून फक्त पोलिसी ची माहिती व status च कळते.
1)गुगल ब्राऊझर मध्ये www.licindia.in अड्रेस टाकून सर्च करा.
2) lic चे होम पेज ओपन होईल.
यात online service मधील LIC e-service वर टच करा.
3)आता registered user व new user असे दोन ऑप्शन येतील.आपण प्रथमच लॉगिन करत असल्यामुळे अर्थातच New User वर टच करून आपल्या पोलिसी च registration करावं लागेल.
4) New Registration करताना आपल्याला आपल्या पोलिसी संदेर्भात :-
Policy Number
Premium Amount
Date Of Birth
Policy Holder's Name
Mobile Number
Email ID
इत्यादी माहिती भरून User Id व पासवर्ड तयार करून घ्या.
तयार केलेला User id व Password तो लिहीन त्याची नोंद ठेवा. एक वेळ User ID व पासवर्ड Generate केल्यानंतर पुन्हा registration वा Generate करण्याची गरज नाही/होणार पण नाही.
5) आता किंवा येथून पुढे आपण तयार केलेला user Id व Password वापरून डायरेक्ट Registered User वर टच करून लॉगिन करा.
लॉगिन पेज वर ज्या पोलिसी ची डिटेल्स पहायची आहेत त्या संदर्भात आपण तयार केलेला User Id , password भरा आणि विचारलेल्या सोप्या गणितीय प्रश्नाचं उत्तर देऊन submit म्हणा.
6) ग्रेट..!
आता आपल्या समोर आपली पूर्ण पोलिसी असेल.
या पेज वर सर्व च ऑप्शन असतील
जस कि
1) Basic service अंतर्गत
Policy Schedule
Policy Status
Claim Status
Loan Status
Bonus
Last Paid Date
Next due Date
व इतर
यातून हवा तो ऑप्शन टच करून policy संदर्भात सम्पूर्ण माहिती मिळेल.
2) Premier Service
या मधून आपल्या पोलिसी चा ऑनलाइन हफ्ता भरू शकतो.
त्याची e-receipts पाहू शकतो. Premium Calendar पाहू शकतो.
3) e-service tools
यामधून आता तयार केलेला पासवर्ड चेंज करता येईल , आपली माहिती अपडेट करता येईल, वारस नाव देता येईल.
नोट:-
आपल्या पोलिसी चा एक वेळ generate केलेला user id व पासवर्ड पुन्हा generate करता येत नाही म्हणून तो कायम जतन करून ठेवा. यात एक वेळ तयार केलेला User ID चेंज करता येणार नाही , फक्त password चेंज करता येईल.
अशा प्रकारे आपल्या पोलिसी संदर्भात सर्व काही माहिती मिळवता येईल.
App मधून देखील थोडीशी माहिती मिळेल .पण app वापरण्या पूर्वी आपल्याला वरील प्रमाणे user ud व पासवर्ड generate करूनच app वापरावे लागेल. तोच User Id व Password टाकून app मध्ये लॉगिन करता येईल.
यासाठी appपुढील इमेज वर क्लिक करून डाउनलोड करा.
चला तर मग आपली स्मार्ट फोन चा स्मार्ट असा उपयोग करू. आपला पैसा व बहुमूल्य वेळ वाचवू.
www.licindia.in आणि LIC Mobile App दोन्ही वरून लॉगिन करून स्मार्ट lic धारक व्हा व इतरांनाही सांगा.
nice
उत्तर द्याहटवाThanks for sharing this impressive blog. Top LIC Agent near me
उत्तर द्याहटवाI want to purchase LIC policy. Can you please tell me the best plan for the family insurance?
उत्तर द्याहटवा“Mudrabhandar
Thank you for this information , it's helpful for who want to join LIC as agent .
उत्तर द्याहटवा